आरोग्य

पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

माहेर फाउंडेशन व जिल्हा क्रीडा कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम

नगर (प्रतिनिधी) – त्र्यंबकेश्वर वडांगळी (नाशिक) ते पंढरपूर पायी दिंडी शहरात दाखल होताच, डीएसपी चौक येथील शासकीय बंगल्यांच्या प्रांगणात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. जिल्हा क्रीडा कार्यालय व माहेर फाउंडेशनच्या वतीने युवक कल्याण योजनेअंतर्गत दिंडीतील ४१० वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून आवश्यक त्या औषधांचे वाटप केले. यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी या सेवेला भरभरून प्रतिसाद दिला. दिंडीचे मुख्य प्रवर्तक ह.भ.प. नामदेव महाराज खुळे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास माहेर फाउंडेशनच्या अध्यक्षा रजनीताई ताठे, सचिव पूनम नगरकर, प्रियंका नगरकर, सोनाली नगरकर, जयश्री शिंदे, शकुंतला लोखंडे, ॲड. दिनेश शिंदे, ॲड. महेश शिंदे, पोपट सईद, मनीषा खुळे, मंदा खुळे, दशरथ खुळे, सुनील मवाळ, अशोक खुळे, मधू चव्हाणके, रविंद्र खुळे, गणपत खुळे, संगीता खुळे, विश्‍वास खुळे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात बोलताना ह.भ.प. नामदेव महाराज खुळे म्हणाले, “सुदृढ आरोग्य हीच खरी शाश्वत संपत्ती आहे. नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध होते आणि शरीरासाठी आरोग्य आवश्यक असते. दिंडीद्वारे मानसिक प्रसन्नता मिळते. सेवा हीच खरी ईश्वरभक्ती आहे.”

रजनीताई ताठे यांनी सांगितले की, “दरवर्षी वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा देणे ही आमच्या संस्थेची विठ्ठलभक्तीची एक रूप आहे. समाजातील गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.”

या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयाचे विशेष सहकार्य लाभले. डॉ. गणेश खेडकर, डॉ. जागृती गोयल, दिपाली पागिरे, तसेच उमंग फाउंडेशनचे डॉ. संतोष गिर्हे यांनी तपासणीची जबाबदारी सांभाळली. याशिवाय जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढावळे, विशाल गर्जे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, तसेच विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमामुळे श्रद्धा आणि सेवाभावाचे सुंदर मिश्रण बघायला मिळाले असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबवलेला हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker