मुट कोर्टमुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात होतात- न्या. पेडणेकर

नगर,( रियाज पठाण )- “विधी महाविदयालयात अभिरुप न्यायालयाचे ( Moot Court) आयोजन करणं महत्त्वपूर्ण आहे. यामुळे विदयार्थ्यांना वकिली व्यवसायाची विविध कौशल्ये आत्मसात होतात. तसेच कायदयातील विसंगती, त्रुटी आणि बारकावे या महत्वाच्या बाबींचे ज्ञान प्राप्त होते. वकिलांनी न्यायालया पुढे उभे राहताना पूर्ण तयारीनिशी आणि खटल्याचा सखोल अभ्यास करुनच उभे रहावे. अभिरुप न्यायालयाच्या (Moot Court) माध्यमातून व्यवसायीक आणि समाजाभिमुख वकिल ( Advocate) घडण्याचे महत्वपूर्ण कार्य होते” असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती (Justice) ए. आर. पेडणेकर यांनी केले. येथिल न्यू लॉ कॉलेज येथे आयोजित सातव्या एस. बी. म्हसे पा. सातव्या राज्यस्तरीय अभिरुप न्यायालय स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

स्पर्धेचे उद्घाटन ( Inauguration) मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. तसेच कै. न्यायमुर्ती एस. बी. म्हसे पा. यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव ॲड विश्वासराव आठरे पा., खजिनदार ॲड दिपलक्ष्मी म्हसे, सहसचिव जयंत वाघ, प्रधान जिल्हा न्यायधीश अंजू शेंडे, कार्यकारणी सदस्य दिपक दरे, ॲड .माणिक मोरे, सौ. अलका जंगले, सौ. अरुणा काळे, प्रा. अशोक चौधरी, ॲड खडे, ॲड .सुभाष भोर, जिल्हा सरकारी वकिल ॲड. सतिश पाटील प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे, स्पर्धेचे समन्वयक प्रा. विजयकुमार शिंदे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अ.नगर जि. मराठा विदया प्रसारक समाजाचे अध्यक्ष रामचंद्रजी दरे हे होते. त्यांनी सांगितले की, न्यायमूर्ती म्हसे यांचे संस्थेसाठी फार मोठे योगदान आहे. संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेऊन न्यायमूर्ती एस. बी. म्हसे यांच्या नावाने महाविदयालयाने अभिरुप स्पर्धा सुरु केली. न्यायमूर्ती म्हसे यांच्या कार्याचा व त्यांनी संस्थेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले.
कार्यक्रामाचे प्रास्ताविक करताना ॲड. माधवेश्वरी म्हसे यांनी गत सहा स्पर्धांचा आढावा घेतला. तसेच दिवसेंदिवस स्पर्धेचा आलेख वाढता असल्याचे सांगून न्या. म्हसे यांच्या विधी क्षेत्रातील अनमोल योगदानाचा उल्लेख केला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून विधी महाविदयालयाचे एकूण 24 संघ सहभागी झालेले आहेत. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ॲड. अमरजित सिंग गिरासे, ॲड. अविनाश बोरुळकर, ॲड. प्रसन्न चव्हाण, ॲड. निलेश घाणेकर, अँड. सिध्देश्वर ठोबरे, ॲड. प्रमोद पाटणी हे काम पाहणार आहेत.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सुहास तोरडमल यांनी करून दिला. डॉ. बी.डी. पांढरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अधिक्षक हेमा कदम, प्रा. गिरिष हिरडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत.