क्रीडा व मनोरंजन

वडगाव गुप्ता येथील रंगमुद्रा युवा प्रतिष्ठानचे “मर्म” प्रथम

नगर : येथील सावेडी उपनगरातील माऊली सभागृहात 25 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2024 या कालावधीत 63 वी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा झाली. या स्पर्धेतील नगर केंद्रावरील प्राथमिक फेरीत वडगाव गुप्ता येथील रंगमुद्रा युवा प्रतिष्ठानने सादर केलेल्या “मर्म’ नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.

नगर केंद्रातून रंगमुद्रा युवा प्रतिष्ठान, वडगाव गुप्ता या संस्थेच्या ‘मर्म’ या नाटकाला प्रथम पारितोषिक, सप्तरंग थिएटर्स, अहिल्यानगर या संस्थेच्या ‘पंचमवेद’ या नाटकास द्वितीय पारितोषिक तर जय बजरंग युवा सांस्कृतिक, क्रीडा, ग्रामीण, शैक्षणिक मंडळ, अहिल्यानगर या संस्थेच्या ‘झिम पोरी झिम’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली.  या स्पर्धेत एकूण 14 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शंकर घोरपडे, डॉ. राजीव मोहोळकर आणि डॉ. उषा कांबळे यांनी काम पाहिले. मर्म आणि पंचमवेद या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

दिग्दर्शन प्रथम पारितोषिक: रियाज पठाण (मर्म), द्वितीय पारितोषिक: डॉ. श्याम शिंदे (नाटक- पंचमवेद)

प्रकाश योजना प्रथम: गणेश लिमकर (तो तिचा दादला आणि मधला), द्वितीय: पवन पोटे (झिम पोरी झिम)

नेपथ्य प्रथम: अंजना मोरे (अमाशी), द्वितीय: क्षितीज कंठाळे (झिम पोरी झिम)

रंगभूषा प्रथम: चंद्रकांत सैंदाणे (राजर्षी), द्वितीय: संकेत शाह (झिम पोरी झिम)

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे रेणुका ठोकळे (प्रियंका आणि दोन चोर), शुभदा पटवर्धन (मर्म), पुनम कदम (राजर्षी), पल्लवी दिवटे (तो तिचा दादला आणि मधला), नानाभाऊ मोरे (तो तिचा दादला आणि मधला), प्रदीप वाळके (आता कसं करु), संजय लोळगे (झिम पोरी झिम), अथर्व धर्माधिकारी (आता कसं करु)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सिध्दी कुलकर्णी (कन्यादान) व कृष्णा वाळके (प्रियंका आणि दोन चोर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker