गुन्हेगाराला पकडण्यासाठी आता ‘ए आय पोलिस रोबो’
मुंबई,(ऑनलाइन प्रतिनिधी )- आजकाल प्रत्येक क्षेत्रात रोबोचा वापर होताना दिसत आहे. त्याचे कारण आहे कृत्रिम तंत्रज्ञान, म्हणजेच एआयने केलेली प्रगती. चीनमध्ये दररोज नवीन तंत्रज्ञानाविषयी ऐकायला मिळते. चीनने असेच काहीसे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्याची चर्चा आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. चीनने देशातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी चक्क रोबोची निर्मिती केली, ज्याचे नाव ‘आरटी-जी’ आहे. त्यांना पोलिस रोबो या नावानेदेखील ओळखले जात आहे. हे एआय रोबो चक्क एखाद्या चाकाप्रमाणे डिझाइन करण्यात आले आहे.
शेन्झेन येथील रोबोटिक्स कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘आरटी-जीचे अनावरण केले होते. तेव्हा लोकांचा विश्वास होता की हा एक विचित्र मार्केटिंग स्टंट आहे. मात्र, नुकताच हा पोलिस रोबो चीनच्या रस्त्यावर पोलिसांबरोबर असल्याचे दिसून आले. काय आहे ‘आरटी-जी’? रोबो चोरांना कसा पकडणार? याला कोणत्या कारणास्तव तयार करण्यात आले? याविषयी जाणून घेऊ.
चीनचा पोलिस रोबो कसे काम करतो?
चिनी टेक फर्म लॉगऑन टेक्नॉलॉजीने विकसित केलेले आहे. रोलिंग पोलिस रोबोट्स उच्च जोखमीच्या परिस्थितीत कायद्याची अंमलबजावणी करण्यास मदत करण्यासाठी. तसेच अग्निशमन दलातील मानवी अधिकाऱ्यांची जागा घेण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. ‘द सन’च्या म्हणण्यानुसार, गोल आकाराचे हे रोबो जमीन आणि पाण्यात दोन्हीवर काम करू शकतात. शिवाय खडबडीत भूभाग आणि चिखलाचा सामना करण्यासही सक्षम आहेत. “अरुंद भूभाग, हवामान धोका, धोकादायक कामाचे वातावरण, हिंसक संघर्ष आणि युद्धे, या सर्वांमुळे मानवी जीवन आणि क्रियाकलापांना मोठा धोका आहे. अशा प्रकारे या शैलीतील वातावरणात मानवांची जागा घेण्यासाठी बुद्धिमान रोबो तयार करण्यात आले, हा रोटुन गोलाकार रोबो आहे,” असे कंपनीच्या व्हिडीओत जाहीर केले.
एआय-चालित रोबोकॉप्स चार टनांपर्यंतच्या प्रभावाचे नुकसान सहन करण्यास सक्षम आहेत. ते गुन्हेगारांचे स्वतःला नष्ट करण्याचे प्रयत्न अयशस्वी करतात. एका इन्स्टाग्राम पेजने व्हिडीओ पोस्ट करत लिहिले आहे की, “चीनने नुकतंच गोल आकाराचा पोलिस रोबो ‘आरटी-जी’ आणला आहे. जो गुन्हेगारांचा पाठलाग करू शकतो. ते 35 किलोमीटर ताशी वेगाने फिरतात. अलीकडेच हे रोबोट्स 12 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या हांगझोऊ या गजबजलेल्या शहरातून फिरताना दिसले. त्यावेळी रोबोटिक संरक्षक अधिकारी देखील बरोबर होते. ते गुन्हेगारांचा चेहरादेखील ओळखू शकतात. ज्यामुळे पोलिसांना गुन्हेगार पकडण्यात मदत होते. विशेष म्हणजे ते नेट गनचाही वापर करू शकतात. हे रोबोट्स अश्रुवायू स्प्रेअर्स, काही ग्रेनेड्स, लाऊडस्पीकर आणि ध्वनी-लहरी पसरवणाऱ्या उपकरणांसह इतर गैर-प्राणघातक उपकरणांसह सुसज्ज आहे. सध्या एआयवर चालणाऱ्या रोबोकॉप्ससाठी उत्पादन खर्चाची श्रेणी 30 हजार ते चार लाख आहे, असे रोबोच्या ग्लोबल स्टेट रनचे नेतृत्व करणारे झेजियांग विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक वांग यू यांनी सांगितले.
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया काय?
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या एआय रोबोची चर्चा होत आहे. “ते काय करणार आहे? ते मंद गतीने चालणाऱ्या पोलिसांच्या कामात काही प्रगती करू शकेल,” असे एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले. आणखी एक जण चिडून म्हणाला, “मी एकदा पोलिसात भरती होण्याचा प्रयत्न केला. मला शारीरिक परीक्षेमध्ये अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.” अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
हे रोबोकॉप रोबोटिक गुन्हेगारी थांबवण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये चीनचे पहिले पाऊल नाही. वाढती गुन्हेगारी रोखण्यात मदत करण्यासाठी देश नाविन्यपूर्ण उपकरणे आणत आहे. ‘आरटी-जी’च्या आधी चीनने ‘रोबो-डॉग’ विकसित केले ज्यांना चाक आहेत, त्यामुळे ते खडबडीत प्रदेशातून वेगवानरित्या पळू शकतात आणि स्टंट करू शकतात. ‘द सन’च्या म्हणण्यानुसार, ह्युमनॉइड रोबोट्समध्ये तज्ज्ञ असलेली एक चिनी तंत्रज्ञान कंपनी ‘दीप रोबोटिक्स’ या ‘रोबो-डॉग’चे वर्णन अतिशय वेगवान आणि न थांबवता येणारे,” असे करते. चाके असल्यामुळे ते उंच उतारावरून धावू शकतात आणि अडथळ्यांवरून सहजतेने उडी मारू शकतात. याव्यतिरिक्त चाके लॉक करू शकतात. रोबोटला पारंपरिकपणे चालण्यास, पायऱ्या चढण्यास आणि ॲक्रोबॅटिक हालचाली करण्यासही तयार करण्यात आले आहे.