पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच. शिंदे आणि पवार राजी !
गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सहमती दर्शवल्याचे सूत्रांनी कळवले.फडणवीस यांच्या नावावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे एकमत झाले. दोघांनीही फडणवीस यांना पाठिंबा दिल्याचे सूत्रांकडून समजते.
याशिवाय शिंदे यांना योग्य तो सन्मान देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. आता येत्या दोन दिवसांत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखाते देण्याची तयारी सुरू आहे. त्याचवेळी नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभाग शिवसेनेला देण्याचे मान्य करण्यात आले आहे. याशिवाय गृह आणि महसूल ही खाती भाजप स्वतःकडे ठेवणार आहे.
मंत्र्यांच्या संख्येच्या सूत्रावर अजून चर्चा बाकी आहे. याशिवाय शिंदे पुन्हा एकदा अमित शहा यांची भेट घेऊ शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एकमत झाले असून गृहखाते त्यांच्याकडेच राहू शकते. याशिवाय भाजपला नगरविकास खाते स्वत:कडे ठेवायचे असून त्याबदल्यात महसूल खाते देण्याची तयारी आहे. मात्र, शिंदे यांनाही नगरविकास खाते हवे आहे.
गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सहमती दर्शवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बैठकीनंतर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मीटिंग चांगली आणि सकारात्मक होती. ही पहिलीच भेट होती. आमची अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. महायुतीची दुसरी बैठक होणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार याबाबत या बैठकीत निर्णय होणार असून, ही बैठक मुंबईत होणार आहे.
शिंदे-पवार यांनी शहा यांना विश्वास दिला.
एकनाथ शिंदे आता याबाबत आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून निर्णय घेतील. मात्र आपला पक्ष महायुतीच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी अमित शहांना दिली. शिंदे यांनीही विधान परिषदेचे सभापतीपद आपल्या पक्षाला मिळावे, असा आग्रह कायम ठेवला आहे. बैठक संपवून अजित पवार आणि फडणवीस मुंबईला रवाना झाले. शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या घरी खासदारांची बैठकही घेतली आणि त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले.
आज मुंबईत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊ शकते. येत्या दोन दिवसांत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेऊन नेत्याची निवड केली जाऊ शकते. त्यासाठी दिल्लीहून केंद्रीय निरीक्षक येणार आहेत.