Uncategorized

गुलमोहर रस्त्यावरील एका घरातून एक किलो चांदीचे दागिने चोरीला

नगर,( प्रतिनिधी)– सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील किर्लोस्कर कॉलनीत रविवारी (24 नोव्हेंबर) रात्री एक वृद्ध व्यक्तीचे घर फोडून चोरी करण्यात आली. घरातील हॉलमधील देवघरात असलेले एक किलो 210 ग्रॅमचे चांदीचे विविध दागिने चोरून नेले गेले. या प्रकरणी सोमवारी (25 नोव्हेंबर) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विवेक मधुकर रणभोर (वय 68) यांनी फिर्याद दिली आहे. ते किर्लोस्कर कॉलनीतील अमेय हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात व पत्रिका पाहण्याचे काम करतात. घरातील हॉलमध्ये श्री स्वामी समर्थ व श्री दत्त यांचे मंदिर आहे. त्या मंदिरातील देवांच्या अंगावर चांदीचा हार, माणिक खड्यासह अंगठी व टोप, चांदीची पादुका व चिलम होती.

रविवारी रात्री नऊ वाजता फिर्यादी घराच्यावरच्या मजल्यावरील रूममध्ये झोपण्याकरीता गेले होते. घराच्या  खालच्या हॉलमध्ये ते पत्रिका पाहण्याचे काम करतात. जाताना हॉलला बाहेरून व्यवस्थित कडीकुलूप लावून गेले होते. दुसर्‍या दिवशी सोमवारी सकाळी ते उठले असता त्यांना रूमचा दरवाजा ओढणीने बांधून बंद केलेला आढळून आला.

फिर्यादीने घरातील मंदिरात ठेवलेल्या चांदीच्या दागिन्यांची पाहणी केली. त्यांना 50 ग्रॅमचा एक चांदीचा हार, 50 ग्रॅमची माणिक खड्याची अंगठी, 60 ग्रॅमचे दोन टोप, एक किलोच्या दोन पादुका व 50 ग्रॅमच्या चांदीच्या चिलम व सिगारेट असा सुमारे एक किलो 210 ग्रॅम चांदीचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्ष्यात आले. सीसीटीव्ही देखील खालच्या बाजूला फिरवलेले दिसून आले.

त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस अंमलदार संजिवनी नेटके करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker