कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात ; दोन ठार
जुन्नर,( ऑनलाईन प्रतिनिधी)- कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव टेम्पोने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नरमधील कल्याण-नगर महामार्गावर हा अपघात झाला. अण्णा साहेब वाघीरे कॉलेजजवळ आज दुपारी ३:३० च्या सुमारास ही घटना घडली. कुनाल नानाभाऊ काळे (वय 17, मोरदरा, आंबेगव्हाण ता. जुन्नर जि. पुणे ) रविंद्र सावळेराम भुतांबरे (वय 22,मोरदरा, आंबेगव्हाण ता जुन्नर जि पुणे) या तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर श्रीकांत खंडु काळे (वय 17, रा. मोरदरा,आंबेगव्हाण ता. जुन्नर, जि. पुणे) हा जखमी झाला आहे.
तिन्ही तरुण पल्सर दुचाकीवरून टायर आणण्यासाठी बजाारात गेले होते. परत येत असताना समोर आलेलेल्या टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दुचाकीचा चुराडा झाला. दोन्ही तरुणांना काही अंतर फरफटत नेलं होतं.
रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुरेश गेंगजे, शामसुंदर जायभाये, संदीप भोते, नामदेव बांबळे,नदीम तडवी,सचिन गोरे पोलीस पाटील किरण भोर, विलास बटवाल तात्काळ घटनास्थळी हजर झाले होतं. जखमी तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.