विधानसभा निकालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार ? असिम सरोदे
प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांची पोस्ट चर्चेत
पुणे,( ऑनलाईन प्रतिनिधी) – राज्यातील निकाल हे अनाकलनीय असल्याचं असीम सरोदे म्हणालेत. अनेकांचे फोन आले. की या निकाला विरोधात न्यायलयात जावं का? पण त्यासाठी पुराव्यांची आवश्यकता असते. त्याबद्दल मी फेसबुक लाईव्ह करणार आहे, असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. मध्यंतरीच्या काळात असीम सरोदे यांनी अनेक ठिकाणी ‘निर्भय बनो’ अंतर्गत सभा घेतल्या होत्या.
असीम सरोदे यांची फेसबुक पोस्ट
अनेक जण जे निवडणुकीत हरले आहेत त्यांना निवडणूक निकाल चॅलेंज करायचे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. मी आज अश्या अनेकांच्या फोन कॉल्स ला उत्तरे दिलीत. निवडणूक याचिका करतांना नेमके आक्षेप, प्राथमिक पुरावे आवश्यक असतात. केवळ भावनाशील होऊन हायकोर्टमध्ये चांगली पिटिशन होऊ शकत नाही.
मी उद्या शक्य झाल्यास याबाबत फेसबुक लाईव्ह करून निवडणूक याचिका करण्यासाठी आवश्यक माहिती देणार आहे. निवडणुकीला आव्हान देण्याचा हक्क केवळ हरलेल्या उमेदवारांना नाही तर कुणी त्या मतदार संघातील उमेदवार सुद्धा अशी याचिका करू शकतात.
निवडणूक निकाल अनाकलनीय लागले हे तर अगदी महायुतीतील अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना माहिती आहे. आधी सुद्धा निवडणूका व्हायचे व लोक पराभूत व्हायचे पण निवडून आलेल्या व विजयी झालेल्या उमेदवारांच्या बाबत इतक्या शंका कधी नसायच्या. फ्री अँड फेअर निवडणूक प्रक्रिये समोर विश्वासहार्यतेचे मोठे आव्हान आहे. असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.