कोणत्या रागापोटी ही लाट उसळली कळत नाही- उध्दव ठाकरे
मुंबई,( ऑनलाईन प्रतिनिधी)- लोकांनी महायुतीला मतं का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का? कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का? महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात म्हणून दिली का? कोणत्या रागापोटी ही लाट उसळली कळत नाही. या मागचं गुपित शोधावं लागेल. असं उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना सांगितलं.
महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर कुणीच काही बोलण्याची गरज नाही. निकाल मान्य नसेल तर प्राणपणानं लढत राहू. महाराष्ट्राच्या जनतेला वचन देतो आम्ही तुमच्या सोबत राहू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ते जिंकले आहेत, त्यांचं अभिनंदन करायला कद्रूपणा करणार नाही. लाडकी बहीण योजनेद्वारे 2100 रुपये देतील, शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील, अशी अपेक्षा आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. कुटुंबप्रमुखाप्रमाणे माझे ऐकणारा महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, असेही त्यांनी सांगितलं.