जिल्हा

शिक्षक भारती जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी निवडी जाहीर

नगर,( प्रतिनिधी )- शिक्षक भारती संघटनेच्या  अहिल्यानगर जिल्हा कार्यकारणीवर सर्वांनुमते पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. दिवसेंदिवस शिक्षकांच्या प्रश्नांमध्ये वाढ होत चालली आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना बळकट करणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती संघटना काम करते.

शिक्षक भारती संघटनेच्या राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, आ. कपिल पाटील, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, विनाअनुदान धोरण समितीचे राज्याध्यक्ष जयवंत भाबड, महिला अध्यक्ष रूपालीताई कुरुमकर, पुणे विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, जिल्हाध्यक्ष रामराव काळे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा कार्यकारणीवर नियुक्त करण्यात आल्या. साईनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिर्डी येथील प्रा. संजय भाऊराव तमनर यांची अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

प्रा. संजय भाऊराव तमनर (अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष)

चंद्रगीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मांजरी ता. राहुरी येथील बाळासाहेब मकाजी तांबे यांची जिल्हा मार्गदर्शक पदी निवड करण्यात आली.

बाळासाहेब मकाजी तांबे (जिल्हा मार्गदर्शक)

पोहेगाव कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रा. नरेंद्र लहिरे यांची कोपरगाव तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

प्रा. नरेंद्र लहिरे (कोपरगाव तालुकाध्यक्ष)

प्रेमराज सारडा महाविद्यालय येथील प्रा. साईनाथ थोरात यांची अहिल्यानगर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

प्रा. साईनाथ थोरात (अहिल्यानगर तालुकाध्यक्ष)

पाथर्डी तालुका उपाध्यक्षपदी संतोष आठरे यांची निवड करण्यात आली.

संतोष आठरे (पाथर्डी तालुका उपाध्यक्ष)

सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिक्षक भारती संघटनेचा प्रचार, प्रसार करण्याची ग्वाही सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी दिली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सचिन जासूद, दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, प्रसिद्धीप्रमुख अमोल चंदनशिवे, तालुका अध्यक्ष संजय सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, संजय भालेराव, संजय तमनर, नानासाहेब खराडे, रूपालीताई बोरुडे, मफीज इनामदार, कल्पना चौधरी, अकील फकीर, बाबाजी लाळगे, संपत वाळके, गणपत धुमाळ, विजय पांडे, प्रवीण मालुंजकर, अमोल तळेकर, संतोष नवले, श्याम जगताप, प्रवीण मते आदी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker