जिल्हा

कारकिर्दीत चांगले निर्णय घेत काम केल्याचं समाधान : राजेंद्र दासरी

नगर ,(प्रतिनिधी)- येथील आकाशवाणी केंद्रातील कार्यक्रम प्रमुख राजेंद्र दासरी हे नुकतेच निवृत्त झाले. यानिमित्ताने आयोजित सेवानिवृत्ती समारंभात स्नेहीजनांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दासरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेली अनेक वर्षे आकाशवाणीच्या विविध केंद्रांमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. मात्र दीर्घकालीन सेवेनंतर आज आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रातून कार्यक्रम प्रमुख या पदावरून मी निवृत्त होत आहे. माझ्या एकूण कारकिर्दीत खुप चांगले निर्णय घेत काम केल्याचं मोठं समाधान मिळालं. मात्र कुटुंब आणि आरोग्य यासाठी वेळ मिळत नसल्याची खंत होती. ती आता निवृत्ती नंतरच्या आयुष्य्यात दूर होईल असे मत दासरी यांनी व्यक्त केले.
आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रत्येकाला कुठे ना कुठे निरोप घ्यावा लागतो. शासकीय नोकरीत असताना येणारे अनुभव आणि निर्वृत्तीच्या निमित्ताने दाटलेल्या भावना आवरताना कठीण होतं. अशावेळी राजेंद्र दासरी यांनी आप्तेष्ट, सहकारी आणि सामाजाचे ऋण असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमासाठी सर्व कुटुंबीय, आजी-माजी सहकारी आणि आप्तेष्ट उपस्थित होते.  प्रमुख पाहुणे म्हणून अंबिका महिला सहकारी बँकेच्या माजी चेअरमन अ‍ॅड. शारदा लगड  तर अध्यक्ष म्हणून विशेष सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश लगड उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नागपूर झोनचे जी.एस.टी. अतिरिक्त आयुक्त अनंत राख, सौ. शामला दासरी, यांच्यासह समाजातील सर्व क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

आकाशवाणीत राबवले विविध उपक्रम
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत आकाशवाणीत राजेंद्र दासरी यांना संधी मिळाली. अहिल्यानगर येथे प्रसारण अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर बीड येथे बदली आणि पदोन्नती नंतर कार्यक्रम प्रमुख म्हणून आकाशवाणी सोलापूर केंद्रामध्ये त्यांनी सेवा केली. सप्टेंबर 2023 मध्ये पुन्हा अहिल्यानगर येथे पदभार स्वीकारला. या सेवेत असताना त्यांनी अनेक महत्वाची कामे केली. त्यामध्ये हंगामी निवेदकांसाठी केलेली भरती प्रक्रिया असो किंवा श्रोत्यांसाठी राबविलेले विविध कार्यक्रम. अहिल्यानगर आकाशवाणी केंद्रात आल्यानंतर अत्यंत कमी कालावधी मिळून देखील त्यांनी भरीव कामगिरी पार पाडली. यामध्ये विशेष म्हणजे सोलापूर केन्द्राप्रमाणेच अहिल्यानगर आकाशवाणी केंद्रात बंद पडलेले सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरु केले. त्याचप्रमाणे अहमदनगर आकाशवाणी केंद्राचे नाव बदलून ‘अहिल्यानगर आकाशवाणी केंद्र’ असे करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker