वकिली व्यवसाय अत्यंत पवित्र; समाजहितासाठी काम गरजेचे’ न्या. आर. एम. जोशी
अभिरुप न्यायालय स्पर्धेचा समारोप
नगर,(लोकनेशन प्रतिनिधी)- वकिली व्यवसाय अत्यंत पवित्र असून समाजहितासाठी काम करणे गरजेचे आहे. समाजाचे आपण देणे लागतो. ही भावना मनात ठेवून या पवित्र व्यवसयाची उंची वाढविणे वकिलांच्या हातात आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुध्दा वकिल मंडळी समाजहितासाठी आणि स्वातंत्र्यासाठी आग्रेसर राहीली. वकिलांनी सतत सतर्क राहून कायदे विषयक जागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालय मुंबई, औरंगाबाद खंडपीठाचे नाम. न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी केले. येथिल न्यू लॉ कॉलेज आयोजित कै. एस. बी. म्हसे पा. सातव्या राज्यस्तरीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे बक्षिस वितरण आणि समारोप प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाजाचे सचिव . ॲड विश्वासराव आठरे पा. हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कोषाध्यक्ष ॲड. दिपलक्ष्मी म्हसे, ॲड. माणिक मोरे, प्राचार्य मतकर, प्रा. अशोक चौधरी, डॉ. बाबासाहेब सोनवणे, ॲड. सुभाष भोर, स्पर्धेचे समन्वयक प्रा. विजयकुमार शिंदे, डॉ. अतुल मोरे उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना ॲड. विश्वासराव आठरे पा. म्हणाले की, ‘संस्थेच्या स्थापनेच्या 105 वर्षांपासून संस्थेचा शैक्षणिक आलेख उंचावत चाललेला आहे. ग्रामीण भागातील व बहुजन समाजातील मुलांचा आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणाकडे अधिक कल आहे. ज्यावेळी आम्ही न्यायालयात वकिली व्यवसाय सुरु केला त्यावेळेस पायाभूत आणि आधुनिक सुविधांची अत्यंत कमतरता होती. वरिष्ठ वकिलांच्या हाताखाली काम करताना आम्ही घडत गेलो असे त्यांनी सांगितले.
यावेळी ॲड. माधवेश्वरी म्हसे यांनी बक्षिसांच्या वाढीव रकमेबददल माहिती देवून स्पर्धे संदर्भात मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब सोनवणे यांनी त्यांच्या अनुभवातून विदयार्थ्यांना प्रामाणिकपणे, सचोटीने व उत्कटतेने काम करावे तसेच आपले जीवन जगताना जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी सचोटीने काम करावे. तसेच आपल्यापरीने 100 टक्के प्रयत्न करावे व कोणत्याही कारणाने कुणाही बरोबर भेदभाव करु नका, असे मार्गदर्शन केले.कार्यक्रामाचे प्रास्ताविक डॉ. अतुल मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे, प्रा. डॉ. रामेश्वर दुसुंगे यांनी केले. तर आभार प्रा. विजयकुमार शिंदे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अधिक्षक हेमा कदम, डॉ. बी. डी. पांढरे, प्रा. गिरिष हिरडे, प्रा. सुहास तोरडमल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रामाचे प्रास्ताविक डॉ. अतुल मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे, प्रा. डॉ. रामेश्वर दुसुंगे यांनी केले. तर आभार प्रा. विजयकुमार शिंदे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अधिक्षक हेमा कदम, डॉ. बी. डी. पांढरे, प्रा. गिरिष हिरडे, प्रा. सुहास तोरडमल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
गेले सात वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. दिवसेंदिवस या स्पर्धेला प्रतिसाद वाढत आहे. या वर्षी स्पर्धेत विधी महाविदयालयाचे राज्यभरातून एकूण 24 संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचा निकाल- (पारीतोषिक स्वरुप प्रशस्तीपत्र, ट्रॉफी, रोख रक्कम) प्रथम पारितोषिक मार्डन लॉ कॉलेज, पुणे, व्दितीय पारितोषिक वसंतराव पवार लॉ कॉलेज, बारामती, उतेजनार्थ पारितोषिक- डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, पुणे. उत्कृष्ट वकील पारितोषिक कु. समृध्दी विठ्ठल भुतारे, न्यू लॉ कॉलेज, अ.नगर, उत्कृष्ट महिला वकील पारितोषिक कु. रसिका पाठक, डॉ. डी .वाय. पाटील लॉ कॉलेज, पुणे, उत्कृष्ट मेमोरियल बक्षिस डॉ. डि. वाय. पाटील लॉ कॉलेज, पुणे