पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अजित दादांना साकडे !
आ. काशिनाथ दाते यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड पाणी प्रश्नावर आग्रही
पारनेर, (प्रतिनिधी)- आ. काशिनाथ दाते व जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पारनेर तालुक्यातील पठार भागाचा पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बुधवार दि. 18 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनानिमित्त विजयगड या निवासस्थानी ही भेट झाली.
यावेळी पारनेरच्या पठार भागाच्या 02 टी.एम.सी. पाण्या संदर्भात चर्चा झाली. तसेच सुपा एमआयडीसीचा विस्तार करण्यात यावा. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. सुपा एमआयडीसी दहशतमुक्त व्हावी अशा विविध प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आ. काशिनाथ दाते व जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी चर्चा केली.
पठार भागाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यास पारनेर तालुक्याची दुष्काळी ओळख काही अंशी का होईना कमी होईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. हा प्रश्न सोडवावा असा आग्रह आ. काशिनाथ दाते यांनी केला. तसेच सुपा एम आय डि सी मध्ये स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, या एमआयडीसीचा विस्तार झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. या रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सुबलता येईल. तरुण आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल. त्यामुळे एमआयडीसी कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आ. दाते यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या लक्षात आणून दिले. पारनेर – नगर मतदारसंघातील प्रलंबित असणारे सर्व कामे मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा सकारात्मक असल्याचे आमदार दाते यांनी सांगितले.
अजितदादांनी दिला विशेष वेळ पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामां संदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा झाली.
प्रशांत गायकवाड,
मा. जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.