महाराष्ट्र

या आमदारांची मंत्रीमंडळात लागणार वर्णी..

मंत्रीपदाच्या शर्यतीत संभाव्य नावे आली समोर?

लोकेशन ऑनलाईन प्रतिनिधी – राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून तीन आठवडे उलटले आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले असले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. उद्या 15 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे बोलले जात आहे. ततपूर्वी मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेताना दिसत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली नावांची यादी दिल्लीत पोहोचली.  औपचारिकता असली तरी आज यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे.

रविवारी 15 डिसेंबरला राज्य मंत्रिंडळाचा शपथविथी होणार असल्याची माहिती मिळत आहे. नागपूरमध्ये राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी दुपारनंतर मंत्रिपदावर वर्णी लागणाऱ्यांना संपर्क सुरु होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता काही मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. संभाव्य मंत्र्यांना खुद्द देवेंद्र फडणवीस फोन करुन कळवणार आहे.

शिवसेनेत मंत्रीपदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरु
महायुती सरकारचा उद्या नागपूरमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी शिवसेनेत मंत्रीपदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरु झाले आहे. सकाळपासूनच मुंबईतील सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी नेते दाखल होत आहे. शुक्रवारी रात्री उशीरा 1.30 वाजेपर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दिपक केसरकर यांच्या नावाचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मागचं सरकार स्थापन झालं, तेव्हापासून संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. निदान यावेळी तरी मंत्रिपद मिळावे असा दोघांचा प्रयत्न आहे.

मात्र यंदा एकनाथ शिंदे नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदेकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.

भाजपकडून कोणाची नावे?
राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाकडून राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, अतुल सावे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, जयकुमार रावल, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल भातखळकर, नितेश राणे व गोपीचंद पडळकर या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत.

अजित पवार गटातून कोणाची नावे?
सत्ताधारी महायुतीमधला तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) यादीतही संबंधित आमदारांची नावं असल्याची चर्चा आहे. त्यात छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, अनिल पाटील, संजय बनसोडे व मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद तर सना मलिक व इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रीपद मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker