देश-विदेश

संजय मल्होत्रा रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नवे गव्हर्नर

नवी दिल्ली, (ऑनलाइन प्रतिनिधी) केंद्र सरकारने रिझर्व बँकेच्या नव्या गव्हर्नरची घोषणा केली आहे. संजय मल्होत्रा हे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नवीन गव्हर्नर असणार आहेत. शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर रोजी संपत होता.

दास यांना एक्स्टेन्शन मिळणार अशी चर्चा होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून सध्याला महसूल सचिव असलेल्या संजय मल्होत्रा यांची नियुक्ती नव्या आरबीआय गव्हर्नरपदी करण्यात आल्याचं जाहीर केलं केलाय.

संजय मल्होत्रा हे महसूल सचिव या पदावर कार्यरत आहेत. संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅचे आणि राजस्थान केडरचे IAS सनदी अधिकारी आहेत. त्यांनी कानपूरमधून कंप्यूटर विज्ञान मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. संजय मल्होत्रा ​​यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव आहेत. त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते. संजय मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker