हॅलो, फडणवीस बोलतोय.. मातोश्रीवर फोन, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
मुंबई, ( ऑनलाइन प्रतिनिधी)- देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
याच्या एक दिवस आधी म्हणजे 4 डिसेंबरला त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. नियम व सूचनांनुसार विरोधी पक्षालाही शपथविधीसाठी बोलवावे लागते. या अनुषंगाने आपण ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यात विरोधकांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय राहिला. याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, “शरद पवारांना फोन केला. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने ते येऊ शकणार नाहीत, असे शरद पवार म्हणाले, पण त्यांनी मला मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या. फडणवीस पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले होते. आमची चांगली चर्चा झाली. त्यांनी माझे अभिनंदन केले आणि माझ्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.”
विरोधी पक्षनेते शपथविधीला आले असते तर मला अधिक आनंद झाला असता.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे नेते शपथविधीला आले असते तर मला अधिक आनंद झाला असता. यासोबतच 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या शपथविधीलाही आपण गेलो होतो, असंही ते म्हणाले. राजकारणातील कटुतेमुळे विरोधक आले नाहीत का? असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, “मला तसे वाटत नाही. कधी लोक येतात, कधी येत नाहीत.”
‘माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत’
प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणारे फडणवीस म्हणाले की, मी विरोधकांना त्यांच्या संख्येच्या आधारावर न्याय देणार नाही. “मी त्यांच्या समस्या देखील ऐकेन,” त्यांनी न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. फडणवीस म्हणाले की, गेली पाच वर्षे आव्हानांनी भरलेली होती. ते म्हणाले, 2019 मध्ये जनादेश मिळाल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला… आम्ही अडीच वर्षे लढलो आणि त्या काळात आमचे सर्व मित्र पक्ष आमच्यासोबत होते. “मी कधीही कोणत्याही पोस्टिंगसाठी पैसे घेतले नाहीत आणि माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत.”