लग्न लावून परतणारे मायलेकरे स्कार्पिओच्या धडकेत गतप्राण
पाथर्डी,(प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील कारेगाव शिवारात झालेल्या अपघातामध्ये माय लेखांचा जागीच मृत्यू झाला. लग्न दुचाकी व स्कॉर्पिओ गाडीच्या समोरासमोर झालेल्या जोराच्या धडकेमध्ये माय लेखांचा मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमनाथ कुंडलिक खेडकर वय 20 व ताराबाई कुंडलिक खेडकर वय 40 हे शेवगाव तालुक्यात एका विवाह समारंभासाठी गेले होते. लग्न समारंभ उरकून गावाकडे परत असताना हा अपघात घडला. पाथर्डी- मोहटादेवी रस्त्यावर मात कारेगाव शिवारात ही घटना घडली. मोहटा देवी दर्शन उरकून आलेल्या स्कार्पिओने एम एच 16 बी एच 31 52 या गाडीने दुचाकीला जोराची धडक दिली. दुचाकी वरून आपल्या घराकडे जाणारी माय लेकरे जागीच गतप्राण झाली. जोराची धडक बसल्याने दुचाकी वरून दोघे दूर फेकली गेली.
स्कॉर्पिओ जागीच पलटी होऊन पुढील डाव्या बाजूचे चाक निखळून पडले. रस्त्याने जाणाऱ्या महिलेला वाचवताना हा अपघात घडला. स्कॉर्पिओ मध्ये असलेले कुटुंब किरकोळ जखमी झाले. अपघातात स्मरण पावलेल्या व्यक्तींना पाथर्डी येथील जिल्हा उपा रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलीस उशिराने दाखल होऊन पंचनामा करून योग्य ती कारवाई करत आहेत.