देश-विदेश

सलमान खानच होता मारेकऱ्यांच्या रडारवर..

मुंबई, ( ऑनलाइन प्रतिनिधी) – काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. परंतु, बाबा सिद्दिकी यांच्याआधी अभिनेता सलमान खान मारेकऱ्यांच्या रडारवर होता, अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी चौकशीदरम्यान आरोपींनी हा खुलासा केला आहे.

66 वर्षीय सिद्दिक यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील त्यांचा मुलगा झीशान सिद्दिकीच्या वांद्रे पूर्व कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तीन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

चौकशीदरम्यान, आरोपींनी सांगितले की सलमान खान हिटलिस्टवर होता, परंतु त्याला कडक सुरक्षा व्यवसा असल्या मुळे ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला सातत्याने धमक्या

14 एप्रिल रोजी रात्री उशिरा सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. विकी गुप्ता आणि सागर पाल या शूटर्सना नंतर गुजरातमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने या घटनेची जबाबदारी स्वीकारली.

अलीकडच्या काही महिन्यांत सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून वारंवार धमक्या येत आहेत.लॉरेन्स बिश्नोईसोबतच्या भांडणाव्यतिरिक्त सलमान खानला गँगस्टरच्या नावाने धमक्या दिल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

गेल्या महिन्यात सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने धमकी दिली होती. सलमानने मंदिरात जाऊन काळवीट मारल्याबद्दल माफी मागावी किंवा 5 कोटी रुपये देण्याची धमकीही मिळाली होती.

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिष्णोई टोळीतील गुंड आकाश चौहानच्या सहभागाबाबत सध्या गुन्हे शाखा तपास करीत आहे. या संपूर्ण हत्येचा कट रचणाऱ्या मोहम्मद झिशान अख्तरला याप्रकरणात सहभागी करण्यासाठी चौहानचा मोठा सहभाग असल्याचा संशय आहे. पटियाला तुरुंगात असताना अख्तर चौहानच्या संपर्कात होता. याप्रकरणी गुन्हे शाखा चौहानचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

आर्थिक मदत करणाऱ्यालाही अटक

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अकोला येथून सलमानभाई इकबालभाई वोहरा याला अटक करण्यात आली असून तो गुजरातमधील रहिवासी आहे. वोहराने याप्रकरणातील आरोपींना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker