महाराष्ट्र

ज्येष्ठ समाज सेवक बाबा आढाव यांनी अखेर उपोषण सोडलं

पुणे, (ऑनलाईन प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील निवडणूक निकालात सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर झाल्याचा आरोप करीत ज्येष्ठ समाज सेवक बाबा आढाव यांनी पुण्यात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी दिनी आत्मक्लेश आंदोलन सुरु केले होते. आज आंदोलनाचा तिसरा दिवस होता. राज्यातील विविध नेत्यांनी बाबा आढाव यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आढाव यांनी अखेर आत्मक्लेश आंदोलन मागे घेतले.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यातिथीच्या औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे उपोषण सुरु केले होते. विधानसभा निवडणूकांत सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या उपोषणाला महत्व प्राप्त झाले होते. आज शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांचे मत जाणून घेतले. त्यानंतर अजितदादा पवार यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतली. नंतर सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी बाबा यांची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. अखेर त्यांच्या मागणीला मंजूरी देऊन बाबा आढाव यांनी आपलं उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

अखेर आंदोलन मागे घेतले

उद्धव ठाकरे यांनी राज्यात एवढे राक्षसी मतदान होऊनही कुठेच जल्लोष किंवा उत्साह दिसत नाही. आता सत्येमेव जयते नाही तर सत्ता मेव जयते सुरु आहे. त्यामुळे या निकालाने राज्यातील जनता आनंदी झाल्याचे दिसत नाही. मतदाराला आपले मत नेमके कोणाला जाते हे जाणण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. केवळ पावतीवर चिन्ह दिसले हे पुरसे नाही. जर फेरमतदानाची मागणी केली तर लागलीच मान्य झाली पाहीजे अशी मागणी केली. तसेच इलेक्शन कमिशन विरोधला हा लढा असाच महाविकास आघाडी सुरु ठेवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बाबा आढाव यांचे वय ९४ वर्षे त्यांना आपण प्रथमच भेटत आहोत. ते म्हातारपण मान्य करत नाहीत आम्हाला त्यांचा आशीवार्द मिळाला आहे. त्यांनी उपोषण सोडावे त्यांचा लढा महाविकास आघाडी पुढे सुरु ठेवेले असे सांगत उद्धव ठाकरे यांना आढाव यांना पाणी प्यायला देत हे उपोषण सोडवले.

अजित पवार यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतली. आम्हाला जास्त मत मिळाली यात आमचा काय दोष असा सवाल अजितदादांनी यावेळी केला.आम्ही जनतेचे पैसे जनतेला दिले. मध्यप्रदेश आणि कर्नाटकात आणि अन्य राज्यात अशा मोफत योजना राबविल्या जात आहेत. मग आम्ही योजना राबिविली त्याला आक्षेप का ? महाविकास आघाडीने तीन हजार रुपये देण्याचे जाहीरनाम्यात जाहीर केलेच ना ? मग आमचा दोष कसा सवाल अजितदादांना आढाव यांनी केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker