क्रीडा संकुलांसाठी खा. लंकेनी केली 45 कोटी निधीची मागणी !
मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांना दिले पत्र
नगर : (प्रतिनिधी) नगर दक्षिणेतील क्रीडा संकुलासाठी खासदार लंकेने केली 45 कोटीची मागणी. वीस कोटी रुपये नगर शहरातील वाडिया पार्क साठी मागितले. तर पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड व शेवगांव या तालुक्यांतील प्रत्येकी पाच कोटीची मागणी खा. लंके यांनी केली.
हा निधीही मार्च महिन्यात मंजुर करण्याची ग्वाही युवा कार्यक्रम तथा खेळ मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली. असे खा. नीलेश लंके यांनी सांगितले.
खा. लंके यांनी नवी दिल्ली येथे मंत्री मांडविया यांची भेट घेतली. त्यांच्या समवेत खा. भास्कर भगरे उपस्थित होते. नगर शहरातील वाडिया पार्क, तसेच विविध तालुक्यांतील क्रिडा संकुल, व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भेट घेण्यात आली.
यासंदर्भात लंके यांनी मांडविया यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, नगर शहरातील वाडिया पार्क हे जिल्हयातील एकमेव प्रमुख क्रीडा संकुल आहे. या संकुलामध्ये अनेक सुविधांची आवष्यकता असून काही सुविधांअभावी विस्तृत आणि मोठे क्षेत्रफळ असूनही या संकुलापासून खेळाडू उपेक्षित राहत आहेत. वाडिया पार्क विकसीत करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास एक गुणवत्तापुर्ण क्रीडा संकुल उभे राहील. त्या माध्यमातून विविध खेळांना प्रोत्साहन मिळू शकेल. असा विश्वास खा. लंके यांनी व्यक्त केला आहे.
नगर शहराबरोबरच पारनेर,श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगांव या तालुक्यांमधील क्रीडा संकुलांमध्येही विविध सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे क्रीडा संकुल असूनही ग्रामीण भागातील खेळाडूंना त्याचा लाभ घेता येत नाही. मंत्री मांडविया यांनी या मागणीचा विचार करून निधी मंजुर करण्याची मागणी खा. लंके यांनी यावेळी केली.
खा. लंके यांच्या मागणीचा विचार करून येत्या मार्च महिन्यात 45 कोटींच्या निधीला मंजुरी देण्याची ग्वाही मंत्री मांडविया यांनी दिल्याचे खा. लंके यांनी सांगितले.