Uncategorized

शिवशाही उलटून आठ प्रवासी ठार ; भरधाव वेगामुळे चालकाचा ताबा सुटला

नागपूर,( ऑनलाईन न्यूज नेटवर्क) – गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळ एसटीची बस उलटली. त्यात आत्तापर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले. इतरही प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, गोंदिया- सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळच्या मुर्दाली जंगल परिसरातून एसटीची शिवशाही बस जात होती. बसची गती मर्यादेहून खूप जास्त होती. अचानक बसने पलटी घेतली. त्यानंतर बस बरेच फुट घासत गेली. या घटनेत बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. ही माहिती कळताच परिसरातील गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाश्यांना वाचवण्याचे काम हाती घेतले.

अपघात ग्रस्त शिवशाही बस

दरम्यान बसमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना काढण्यासाठी नागरिकांकडून बसमधील काचाही फोडण्यात आल्या. वृत्त हाती येईपर्यंत बसमधील सुमारे 8 मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिकांना यश मिळाले होते. पोलिसांनी माहिती मिळतात घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढवला. बसमधील प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

अपघाताची माहिती कळताच एसटी महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभागासह (आरटीओ) इतरही शासकीय यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दुरीकडे अपघातग्रस्त बसमधील जखमींना प्रथम जवळच्या गोरेगाव व सडक अर्जुनीतील ग्रामीण रुग्णालयात व तेथून काही गंभीर रुग्णांना इतरत्र तातडीने हलवण्यात आल्याचीही माहिती उपस्थितांनी दिली. वृत्त मिळेपर्यंत सुमारे आठ मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले होते.

दरम्यान या अपघाताचे वृत्त समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली आहे. तसेच जखमी लोकांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत, अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. त्यासोबतच मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please Disable Ad-Blocker