महावितरणची वेबसाईट आणि अॅप डाउन
ग्राहकांना ऑनलाईन वीज बिल भरण्यास अडचणी !
नगर, ( प्रतिनिधी)- महावितरणची वेबसाईट आणि अॅप आज (दि. 26 नोव्हेंबर) सकाळपासून डाऊन झाल्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन बिल भरण्यास अडचणी येत आहेत. सध्या बहुतांश ग्राहक हे महावितरणच्या वेबसाईट किंवा अपवरून ऑनलाईन वीज बिल भरतात. मात्र आज सकाळपासून महावितरणची वेबसाईट आणि अॅप हे दोन्ही उघडत नसल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. फोन पे किंवा गुगलपे वरूनही बिल भरण्याचा प्रयत्न केल्यास अडचणी येत आहेत.
या तांत्रिक बिघाडाबाबत महावितरणने अद्यापही कुठला अधिकृत खुलासा केलेला नाही, त्यामुळे वीज ग्राहक संभ्रमात आहेत.सध्या बहुतांश ग्राहक हे महावितरणच्या वेबसाईट किंवा अपवरून ऑनलाईन वीज बिल भरतात. मात्र आज सकाळपासून महावितरणची वेबसाईट आणि अॅप हे दोन्ही उघडत नसल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
फोन पे किंवा गुगलपे वरूनही बिल भरण्याचा प्रयत्न केल्यास अडचणी येत आहेत. या तांत्रिक बिघाडाबाबत महावितरणने अद्यापही कुठला अधिकृत खुलासा केलेला नाही, त्यामुळे वीज ग्राहक संभ्रमात आहेत.